- January 15, 2025
- No Comment
जागेच्या वादातून दोघांना बेदम मारहाण

तळेगाव: जागेच्या वादातून चार जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. ही घटना सोमाटणे फाटा येथे घडली.
विजय चंद्रकांत लांडे (वय ३९, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार उमाकांत मिश्रा, त्याची पत्नी, मेहुणा आणि मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय लांडे आणि विनोद प्रभाकर मालपोटे यांच्यासोबत आरोपींनी जागेच्या मालकी वरून वाद केला. त्यातून विजय लांडे आणि विनोद मालपोटे यांना लोखंडी पाईपने मारून जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.




