• January 17, 2025
  • No Comment

पुण्यात गोळीबाराचा थरार! मस्करीतून मित्रानेच झाडली गोळी, आरोपी अटक

पुण्यात गोळीबाराचा थरार! मस्करीतून मित्रानेच झाडली गोळी, आरोपी अटक

    पुणे: पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयातील परिसरात मित्रांमध्ये चेष्टा-मस्करीतून वाद उफाळला. मित्रानेच गावठी कट्ट्यातून मित्रावर गोळीबार केल्याने तो जखमी झाला आहे.

    सध्या जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू असून भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार बुधवारी (ता.15) रात्री घडला असून निलेश संतोष जाधव (वय-21 रा. सिंहगड महाविद्यालय परिसर) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. तर जखमी असणाऱ्या मित्राचे नाव करण गजलमल असे आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, बब्या उर्फ निलेश आणि करण हे मित्र आहेत. करण सेल्समनचे काम करतो. तर निलेष कोणताही कामधंदा करत नाही. बुधवारी रात्री आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात निलेश, करण आणखीन एक अल्पवयीन एकत्र आले होते.

    यावेळी ते तिघेही मोबाईलवर गेम खेळत होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादातून निलेश याने गावठी कट्ट्यातून करणवर गोळी झाडली. ही गोळी करमच्या खांद्याला लागली. यामुळे तो जखमी झाला आहे.

    जखमी करणला अल्पवयीन मुलाने नागरिकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले. तेथूनच फिर्याद भारती विद्यापीठ पोलिसांना वर्दी देण्यात आली. यानंतर पोलिसांनी निलेशला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करत आहेत.

    दरम्यान 2021 साली अशीच धक्कादायक घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली होती. येथे एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात मारेकऱ्यांनी ६ गोळ्या झाडत तरुणाची हत्या केली होती. तर ही घटना चंद्रभागा हॉटेल समोर घडली होती.

    यानंतर पोलीसांनी अधिक तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. तर प्राथमिक तपासातून ती हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *