• January 17, 2025
  • No Comment

मेट्रो स्टेशनच्या मागील ५० झोपड्या हटविल्या; कोथरूडमध्ये धडक कारवाई

मेट्रो स्टेशनच्या मागील ५० झोपड्या हटविल्या; कोथरूडमध्ये धडक कारवाई

    पुणे: दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनच्या मागच्या बाजूला डेंगळे पुलालगत मोठ्याप्रमाणात अनधिकृत झोपड्या टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. त्यावर महापालिकेच्या परिमंडळ दोन तर्फे भल्या सकाळी सहा वाजता कारवाई करून ५० पेक्षा जास्त झोपड्या काढून टाकल्याने.

    तसेच कोथरूडमधील सुतारदरा भागात कारवाई करून अतिक्रमण काढून टाकून रस्ते मोकळे केले आहेत.

    पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नागरिकांना रस्ते, पादचारी मार्गावरून चालण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्याचा फटका पादचारी नागरिकांना बसत आहेच, पण त्याचसोबत वाहतुकीचा वेग कमी होऊन कोंडी होत आहे. शहरातील अतिक्रमणावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे.

    परिमंडळ दोन मधील घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झोपड्या टाकून नागरिक राहत होते. येथील झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती, याविरोधात प्रशासनाकडे तक्रारी आलेल्या होत्या. तसेच या झोपडपट्टीमुळे डेंगळे पूल भागात वाहतुकीस कोंडी होत होती. त्यामुळे उपायुक्त अविनाश सपकाळ यांच्या नेतृत्वातील मोठा फौजफाटा व जेसीबी, बिगारी घेऊन पहाटे साडेपाचपासून अतिक्रमण कारवाई सुरु करण्यात आली. सकाळी १० पर्यंत ५० पेक्षा जास्त झोपड्या येथून हटविण्यात आल्या.

    कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सुतारदरा दत्तमंदिर चौक ते चार नळ चौकापर्यंत, छत्रपती शंभूराजे चौक सुतारदरा या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. परिमंडळ दोन व तीनचे अतिक्रमण अनधिकृत निर्मुलन विभाग, कोथरूड पोलिस ठाण्यातील पोलीस, महापालिकेकडील महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

    यामध्ये दरम्यान हातगाडी ४२, स्टॉल ५, लोखंडी काऊंटर ५ पथारी १७, शेड २७ यावर जेसीबीच्या साह्याने कारवाई केली. शहरात अशा प्रकारे रस्ता पदपथावर अतिक्रमण असणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जाणार आहे, असे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी सांगितले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *