• January 17, 2025
  • No Comment

पोलीस अधीक्षक साहेब कळंब पोलिसांना जागे करा ? कळंब शहरात चोरांचा धुमाकूळ; जनता भयभीत

पोलीस अधीक्षक साहेब कळंब पोलिसांना जागे करा ?     कळंब शहरात चोरांचा धुमाकूळ; जनता भयभीत

    कळंब. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब शहरात गेल्या पंधरा दिवसात सलग आठ चोरीच्या घटना घडल्या असून चोरांचा धुमाकूळ शहरात वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुस्त पडलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी आता तरी पोलीस अधीक्षक यांनी कळंब पोलीस रशासनाला मास्टर डोज द्यावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे. कळंब शहरासह तालुक्यात ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांच्या सिंचनाचे मोटर पंप कृषी साहित्य तसेच मोटरसायकल लंपास होत आहेत. चोरी अशा घटना घडत असतांना गेल्या पंधरा दिवसापासून मात्र चोरट्यांनी आता आपला मोर्चा कळंब शहराकडे वळविला असून 27 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान दत्त रोड अतकर लेआउट मधील मारुती शिवरकर यांच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यासह

    80 हजारांचा मुद्देमाल आज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून लंपास केला त्याच दिवशी रासा रोडवरील मुनेश्वर राऊत यांचे घरी चोराणे डल्ला मारीत एक चांदीची मूर्ती व 5000 रोख लंपास केली 29 डिसेंबरच्या रात्री कळंब बस स्थानक परिसरातील किराणा दुकानाचे टीन

     

    पत्रे तोडून बावीस ते पंचवीस हजार रुपयाचा सुकामेवा लंपास केला. दुसऱ्याच दिवसात आठवडी बाजार परिसरातील मदिना प्लास्टिक सेंटर व सुहास मेत्रे यांचे बालाजी ट्रेडर्स हेच या दोन्ही दुकानावर चोरट्याने डल्ला मारून सुकामेवा सह नगदी रोकड लंपास केली. लगेच दुसऱ्या दिवशी

     

    दत्त रोडवरील श्रीराम किराणा दुकानात तीन पत्रे काढून प्रवेश करीत किराणा साहित्यसह नगदी रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. कळब शहरात दिवसेंदिवशी होत असलेल्या चोऱ्यांवर आळा घालण्यास कळंब पोलीस अपयशी ठरत आहे.

     

    चोरांचा शोध लावण्यास पोलिस अपयशी

     

    एकाही चोरीचा शोध कळंब पोलिसांनी लावला नसून शहरात सतत चोरीचे सत्र झपाट्याने सुरू केल्याने नागरिकासह व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

     

    ■ लागो पाठोपाठ पंधरा दिवसातच सतत आठ चोरीच्या घटना घडल्याने शहरात चोरांचे ताकद वाढल्याचे दिसत आहे. पोलीस अधीक्षकांनी स्वतः कळंब शहराकडे लक्ष देऊन कळब शहरातील पोलिसांना जागृत करावे अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे.

    ■ लागोपाठ दुसऱ्याच दिवशी चक्रवती नदीच्या पुलाजवळ असलेले चष्मा विक्रीचे दुकान फोडून अज्ञात चोठ्याने किमती चष्म्यासह रोकड लंपास केली सदर चोरी प्रकरणाचा तपास कळंब पोलीस करीत असतानाच चोरट्यांनी पोलिसांसमोर एक पाऊल पुढे टाकीत 10 जानेवारी रोजी रात्री वरदडीच्या बस स्टॅन्ड चौकातील महाकाल पान सेंटर फोडून किमती सिगरेटसह रोकड लंपास केल्याची घटना घडली. शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने जनता भयभीत झाली आहे

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *