• January 17, 2025
  • No Comment

पुणे : स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या ताब्यात, बनावट आधारकार्ड, पारपत्र जप्त

पुणे : स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या ताब्यात, बनावट आधारकार्ड, पारपत्र जप्त

    पुणे: बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी पकडले. महर्षीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त करण्यात आले.

    त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळविली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. बांगलादेशी नागरिक गेले दहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.

    याप्रकरणी एहसान हाफिज शेख (वय ३४, सध्या रा. अरुणा असिफ अली उद्यानाजवळ, महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा कलम १४, पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश, तसेच बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार सोमनाथ ढगे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. २०१४ मध्ये त्याने भारतात घुसखोरी केली होती. त्यांतर तो पुण्यात वास्तव्याला आहे. त्याने कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. स्वारगेट पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने महर्षीनगर परिसरात सापळा लावून शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पारपत्र जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळवली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *