• January 17, 2025
  • No Comment

कोंढवा येवलेवाडी परिसरात अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधात धडक कारवाई

कोंढवा येवलेवाडी परिसरात अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधात धडक कारवाई

    पुणे: पुणे शहरातील कोंढवा येवलेवाडी कार्यालया अंतर्गत बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग व आरोग्य विभाग यांची संयुक्त कारवाई केली आहे.

    महापालिका आयुक्त यांचे आदेशान्वये १६/०१/२०२५ रोजी उप आयुक्त, परिमंडळ क्र.४ पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखालील कोंढवा येवलेवाडी कार्यालया अंतर्गत सायंकाळी ०४.३० ते ०७.३० या कालावधीत व्ही. आय. टी. कॉलेज चौक ते कान्हा हॉटेल या परिसरात अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन, प्लास्टिक प्रतिबंधात्मक, परिसर स्वच्छता कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), जयंत भोसेकर, उप आयुक्त (परिमंडळ क्र.४) व लक्ष्मण कादबाने, महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे नियंत्रणाखाली संयुक्त कारवाई करण्यात आली.

    यावेळी गणेश तारू क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक, मेघा राऊत, अतिक्रमण निरीक्षक व परिमंडळ क्र. ४ कार्यालयाकडील सर्व सहा. अतिक्रमण निरीक्षक, इरफान शेख, बांधकाम निरीक्षक, नकुसा ढोले, प्र. उपअभियंता, सर्व कनिष्ठ अभियंता, राजू दुल्लम व जालिंदर कदम, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सर्व आरोग्य निरीक्षक, अंकुश गायकवाड, आकाशचिन्ह व परवाना निरीक्षक, स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी, मोकादम, सेवक आदी उपस्थित होते. सदर कारवाई मध्ये ६७ अधिकारी / कर्मचारी सहभागी होते. सदर कारवाई साठी १ जे.सी.बी., ४ ट्रक, २ झेनॉन, १ भरारी पथक वाहनाचा समावेश होता. सदर कारवाईत फ्रंट मार्जिन तसेच रस्ता व पदपथावरील अतिक्रमणे काढण्यात आली.

    सदर कारवाईत ४० काउंटर, २ हातगाडी, ६ सिलेंडर तसेच इतर साहित्य जप्त करून अतिक्रमण गोडाऊन येथे जमा करण्यात आले. व सदर कारवाई मध्ये कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सेवकांद्वारे अस्वच्छता / प्लास्टिक वापराबाबत एकूण २६ नागरिकांवर कारवाई करून रक्कम रुपये २३,७००/- इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सदर कारवाई मध्ये कोंढवा येवलेवाडी कार्यालयातील परवाना व आकाशचिन्ह विभागातील सेवकांद्वारे बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, लॉलीपॉप, केऑक्स इत्यादींवर कारवाई करून रक्कम रुपये २०००/- इतका दंड वसूल करण्यात आला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *