• January 17, 2025
  • No Comment

रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकावणारा टोळका गजाआड, 4 मोबाईल जप्त, डेक्कन पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकावणारा टोळका गजाआड, 4 मोबाईल जप्त, डेक्कन पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

    पुणे: शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरासह बाणेर येरवडा परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत चोरट्याला डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले आहेत.

    यापूर्वी त्याच्याविरुद्ध विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. हबीब अबालु इराणी (वय 24, रा. पाटील ईस्टेट, मूळ रा. रशिद कंपाऊंड मुंब्रा, ठाणे) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे

    मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीकडील मोबाईल चोरट्याने हिसकावून नेला होता. त्याअनुषंगाने डेक्कन ठाण्याचे तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक महेश भोसले आरोपीचा माग काढत होते. सीसीटीव्हीसह माहितीवरुन आरोपी फिरत असलेल्या ठिकाणावर लक्ष ठेऊन हबीब इराणी याला ताब्यात घेतले आहे.

    सदरची कामगिरी उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, एसीपी साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, गभाले, महेश शिरसाठ सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, धनाजी माळी, निलेश सोनवणे, नागनाथ म्हस्के यांनी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *