• January 17, 2025
  • No Comment

धक्कादायक! चक्क बापाने केला पोराचा खून,नक्की कारण काय?

धक्कादायक! चक्क बापाने केला पोराचा खून,नक्की कारण काय?

    वडगाव निंबाळकर, ता. १६ : होळ (ता. बारामती) येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय लहान मुलाचा वडिलांनी खून केल्याचे उघड झाले असून, गुन्हा लपवण्यासाठी घरातील सदस्यांनी मदत केल्याचेही पोलिस तपासात पुढे आले आहे.

    विजय गणेश भंडलकर, असे या निर्दयी वडिलांचे नाव असून, आरोपीची आई शालन गणेश भंडलकर व संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अंमलदार सागर विलास चौधरी यांनी फिर्याद दिली.

    मकरसंक्रांतीच्या सणाच्या दिवशी (१४ जानेवारी) हा प्रकार घडला. ‘अभ्यास करत नाही. सारखा बाहेर खेळत असतोस. तू तुझ्या आईच्याच वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय,’ असे म्हणून विजय भंडलकर याने मुलगा पियुष याचा हाताने मारहाण करून व गळा दाबून भिंतीवर आपटून खून केला.

    आरोपी विजय याची आई आणि मृत्यू पावलेल्या पियुष याची आजी शालन गणेश भंडलकर यांनी घटना पाहूनदेखील विजय याला प्रतिबंध केला नाही. याउलट पियुष चक्कर येऊन पडला आहे, अशी खोटी माहिती दिली.

    या घटनेनंतर पियुष याला एका खासगी दवाखान्यात संतोष भंडलकर यांच्या मदतीने नेण्यात आले. पण, पियुष याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याला होळ प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

    परंतु, नातेवाइकांच्या संगनमताने पियुष याच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामतीला आणला. यामध्ये डोक्यावर आघात झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

    या गंभीर घटनेची दखल घेऊन वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदारांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवून आरोपींना ताब्यात घेतले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *