• January 17, 2025
  • No Comment

पुण्यात पुन्हा सापडला मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचा साठा; २३ लाख रुपयांचे ड्रग्स हस्तगत

पुण्यात पुन्हा सापडला मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचा साठा; २३ लाख रुपयांचे ड्रग्स हस्तगत

    पुणे: शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा सापडलाय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत एमडी ड्रग्सचा साठा जप्त केलाय. या ड्रग्सची किंमत २३ लाख रुपये असून याप्रकरणात अहमद खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.

    अहमद खान कोणत्या ड्रग्स रॅकेटचा भाग आहे का? याबाबत पोलीस चौकशी करण्यात येत आहे.

    दरम्यान पुणे शहरात याआधीही ड्रग्स सापडले होते. आता परत शहरात ड्रग्स सापडल्याने खळबळ उडालीय. गुन्हे शाखेने अहमद खानकडून ११० ग्रॅम वजनाचा MD ड्रग्सचा साठा जप्त केलाय. अटक करण्यात आलेल्या अहमद खान हा येरवडा भागातील राहणार आहे. त्याचा कोणत्या रॅकेटशी संबंधित आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलमुळे पुणे शहर चर्चेत आले होते. ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवत होता.

    ललित पाटील ससून रुग्णालयात आजारपणाचं कारण देत ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर २ कोटी १४ लाखांचे ड्रग्स सापडले होते, त्यानंतर पुण्यातील ड्रग्स रॅकेट उघडकीस आले होते. या रॅकटेचा तपास करताना अनेक मोठ्या व्यक्तींचा यामध्ये हात असल्याची माहिती उघड झाली होती. पुणे शहरातील कुरकूंभ येथे ड्रग्ज कारखाना सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या ड्रग्ज प्रकरणाचे थेट लंडन कनेक्शन असल्याचं समोर आलं होतं.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *