• January 17, 2025
  • No Comment

मित्रांच्या मदतीने एकावर जीवघेणा हल्ला; लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण पडल महागात

मित्रांच्या मदतीने एकावर जीवघेणा हल्ला; लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण पडल महागात

    पिंपरी चिंचवड: नातेवाईक महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर एका तरुणाने त्याच्या चार ते पाच साथीदारांच्या मदतीने मिळून कोयत्याने वार केले आहे. ही धक्कादायक घटना भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील लांडगेनगर येथे घडली आहे.

    या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील लांडगेनगर परिसरात घडलेल्या घटनेत भोसरीतील देवकरवस्ती येथील ४० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान फिर्यादी हा संशयित आरोपीच्या नातेवाईक महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. याचा मनात राग असल्याच्या कारणावरून त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादीवर कोयत्याने वार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

    दरम्यान घटनेत सदर इसम गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून भोसरी पोलिसांनी थेरगाव येथील २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तर त्याच्यासह त्याच्या चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *