• January 17, 2025
  • No Comment

हॉटेलमालकासह सहकार्‍यांना कोयत्याने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

हॉटेलमालकासह सहकार्‍यांना कोयत्याने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    सासवड: पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू असताना दुचाकी बाजूला लावण्यास सांगितल्याने हॉटेलमालकासह सहकार्‍यास सात जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, कोयत्याने जबर मारहाण केली. ही घटना भिवरी (ता.पुरंदर) येथे शनिवारी (दि. 11) सायंकाळी 6 वाजता घडली. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत आरोपींवर तातडीने कारवाई करण्यासाठी भिवडी ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 14) उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना निवेदन दिले आहे. हॉटेलचे मालक कैलास निवृत्ती वांढेकर, सहकारी अनिकेत रामदास कटके (दोघे रा. भिवडी, ता. पुरंदर) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. दत्ता शेलार, गणेश पवार याच्यासह त्यांच्या पाच साथीदारांवर (नावे समजू शकली नाहीत) गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद कटके यांनी दिली आहे.

    भिवरी येथे कैलास वांढेकर यांचे निसर्ग हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. या वेळी आरोपी दुचाकी उभी करू लागले असता, त्यांना कामगारांनी दुचाकी बाजूला लावण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने एका कामगाराच्या कानाखाली मारत ‘तुला माहिती नाही, आम्ही कोण आहोत,’ अशी दमदाटी केली आणि ते निघून गेले.

    त्यानंतर अर्ध्या तासाने दुचाकीवरून लाकडी दांडके आणि कोयते घेऊन आरोपी आले. त्यांनी कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अनिकेत कटके भांडण सोडवण्यासाठी आले असता, दत्ता शेलारने लाकडी दांडक्याने डाव्या हातावर आणि डोक्यात जोरदार मारहाण केली. त्यावेळी जखमी झाल्याने ते जोरात ओरडले. त्यांचा आवाज ऐकून कैलास वांढेकर बाहेर आले असता, गणेश पवारने त्यांना कोयत्याने मारहाण केली.

    या घटनेचा निषेध नोंदवीत भिवडी गावातील 400 ते 500 नागरिकांनी सासवड येथे तहसील कार्यालयापासून मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून सासवड पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढला. त्यानंतर आरोपींवर कारवाई करण्याबाबतचे पोलिसांना निवेदन दिले. तसेच, मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनाही निवेदन देण्यात आले.

    या वेळी निरा बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल मोकाशी, बाळासाहेब भिंताडे, शहाजी गायकवाड, उमेश गायकवाड, राहुल मोकाशी, डॉ. मनोज शिंदे, साधू दिघे, नानासाहेब वांढेकर, राहुल गायकवाड, मंगेश भिंताडे, दिलीप भिंताडे, कांताभाऊ खोमणे, पांडुरंग भिंताडे, संजय दिघे, बाळासाहेब क्षीरसागर, दादासाहेब दिघे, सागर मोकाशी आदी उपस्थित होते.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *