- January 17, 2025
- No Comment
धक्कादायक! पुण्यात आजोबाचा 12 वर्षीय नातीवर अत्याचार
पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात एका आजोबाने आपल्याच नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आजोबाने आपल्या 12 वर्षीय नातीवर अत्यावर केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरातील हॉलमध्ये झोपली असताना, आरोपी अजोबाने तिच्या शरीरावर आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला. आरोपी हा तक्रारदार महिलेच्या पहिल्या पतीचे वडील असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अजोबाविरुद्ध विनयभंग आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.