• January 17, 2025
  • No Comment

पोलिसांनी तिघा खंडणीखोरांच्या आवळल्या मुसक्या, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाची कामगिरी

पोलिसांनी तिघा खंडणीखोरांच्या आवळल्या मुसक्या, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाची कामगिरी

    पिंपरी-चिंचवड: किराणा दुकान व्यावसायिकाकडून खंडणी मागणार्‍या आणि स्वीकारणार्‍या तीन आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने तळवडे येथे ही कारवाई केली.

    या धडक कारवाईने स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून, खंडणीखोरांना जरब बसली आहे. भूषण पंढरीनाथ पाटील (वय 27), राहुल सुभाष पाटील (वय 22), सुभाष चंपालाल पाटील (वय 51, तिघे रा. श्रीराम पीजी, तळवडे चौक, तळवडे), अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींना तपासासाठी देहूरोड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

     

    तळवडे येथील किराणा दुकान व्यावसायिकाने 14 जानेवारी रोजी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 जानेवारी रोजी दोन अनोळखी व्यक्ती त्याच्या दुकानात आल्या आणि त्यांनी आरोप केला की, तुम्ही एक्सपायरी झालेले कुरकुरे विकत आहात. त्यामुळे लोकांना उलटी आणि जुलाब होत आहेत. आम्ही मीडियाला बोलावून तुमचं दुकान बंद करू. या धमकीसोबत प्रकरण मिटवण्यासाठी सुरुवातीला 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर, वारंवार फोन करून हप्ता स्वरूपात खंडणी मागण्यात येत होती. मागणीची रक्कम कमी करत 30 लाख, 20 लाख, 12 लाख, 7-8 लाख, 5 लाख आणि शेवटी 2.5 लाख रुपये मागण्यात आले. तक्रारदाराच्या व्यवसायावर दबाव वाढत असल्याने त्यांनी खंडणी विरोधी पथकाला याबाबत कळवले.

     

    तक्रारीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तत्काळ या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाला सापळा रचण्याचे आदेश दिले. 14 जानेवारी रोजी पथकाने तळवडे येथील किराणा दुकान परिसरात सापळा रचला. खंडणी स्वीकारण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले, तर तिसर्‍या आरोपीला एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून 60 हजार रुपये किंमतीचे 3 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

    आरोपींविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 308 (2), 308 (3), 352 आणि 3(5) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या कारवाईमुळे तळवडे परिसरातील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. खंडणीसारख्या गुन्हेगारी कृत्यांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने दिलेला हा धक्का गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खंडणीखोरांसाठी धोक्याचा इशारा ठरला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *