• January 17, 2025
  • No Comment

शासकीय व्यक्तींना घर देण्याच्या नावाखाली लाखोंना घातला गंडा; दोघांची फसवणूक

शासकीय व्यक्तींना घर देण्याच्या नावाखाली लाखोंना घातला गंडा; दोघांची फसवणूक

    हिंजवडी (पुणे): शासकीय व बँक सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बांधकाम साईट विकसित करीत असल्याचे सांगत दोघांची चार लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बुधवारी (दि. १५) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    याबाबत कस्पटे वस्ती, वाकड येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमर कांतीलाल भुमकर (वय ४१, रा. भूमकर चौक, वाकड) आणि गौरव सचदेवा (पत्ता माहिती नाही) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २०१९ ते जून २०२४ या कालावधीत मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या बाजूला, फोक्सवॅगन शोरूमच्या बाजूला, वाकड येथे घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून केंद्रीयसदन या ऑनलाइन वेबसाईटवर केंद्रीय कर्मचारी व बँक सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांसाठी वाकड परिसरात बांधकाम साईट विकसित करीत असल्याची जाहिरात केली. मात्र, कोणतीही साईट विकसित न करता फिर्यादी यांची दोन लाख ५५ हजार व त्यांच्या ओळखीच्या महिलेची दोन लाख रुपये असे एकूण चार लाख ५५ हजारांची फसवणूक केली.हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *