- January 17, 2025
- No Comment
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा, पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार

पुणे: पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस आयुक्तालय येथे झालेल्या बैठकीत दिली आहे. पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
तसेच त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक घेत शहरातली कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कदम म्हणाले, पुणे आयुक्तालयाच्या मी आज आढावा घेतला. 100 दिवसाच्या प्लॅनची अंमलबजावणी कशी केली जात आहे, याचा आढावा घेतला. पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यात आज माझा पहिला दौरा आहे. पुणे पोलीस प्रशासनाला शासनाकडून काही अपेक्षा आहेत. दरवेळेला आम्ही सूचना करत असतो. परंतु, पोलीस कमिशनर असतील त्यांची सर्व टीम असेल त्यांना प्रशासनाकडून शासनाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, त्यांना काय हवं आहे, यावर सुद्धा विचारणा केली आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.




