• January 17, 2025
  • No Comment

पार्टटाइम नोकरीच्या आमिषाने तरुणाला १३ लाखांना घातला गंडा

पार्टटाइम नोकरीच्या आमिषाने तरुणाला १३ लाखांना घातला गंडा

    पुणे: पार्टटाइम नोकरीच्या आमिषाने तरुणाला १३ लाख ४८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना दि. २४ मे ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हडपसर परिसरात घडली आहे. या प्रकरणी सतीश रासकर (वय ४९, रा.हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रासकर हे हडपसरमध्ये राहायला असून, आरोपीसोबत त्यांची ओळख झाली होती. २४ मे २०२४ रोजी त्यांना आरोपींनी पार्टटाइम नोकरीचे आमिष दाखविले. त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल, तरच नोकरी मिळेल असे सांगितले. नोकरीसाठी रासकर यांनी रक्कम आरोपीच्या बँक खात्यात वर्ग केली. वेळोवेळी रक्कम जमा करीत तब्बल १३ लाखांवर रक्कम जमा केल्यांनतरही त्यांना नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याप्रकरणी रासकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करीत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *