• January 17, 2025
  • No Comment

लाडक्या बहि‍णींना जानेवारीचे १५०० रुपये कधी मिळणार? बघा तारीख

लाडक्या बहि‍णींना जानेवारीचे १५०० रुपये कधी मिळणार? बघा तारीख

    महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.

    या योजनेत डिसेंबरचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आला होता. त्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.

    दरम्यान, मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आता जानेवारीचे १५ दिवस उलटून गेले आणि मकरसंक्रांतदेखील उलटून गेली परंतु अजूनही पैसे महिलांच्या अकाउंटला जमा झाले नाहीत म्हणून महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची तारीख ठरली आहे.

    लाडकी बहीण योजनेचा हप्ता २६ जानेवारी २०२५ रोजी जमा होणार आहे, असं आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना दिलासा मिळाला आहे. २६ जानेवारीच्या आधीपासूनच आम्ही लाडक्या बहि‍णींना हप्ता देणार आहोत.

    या महिन्यात १५०० रुपये मिळणार आहेत.आम्ही आमच्या घोषणा पत्रात दिलेल्या सर्व योजना लोकांना देत आहोत. आता आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहोत, असं आदिती तटकरेंनी सांगितले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *