• January 18, 2025
  • No Comment

लोणी काळभोर परिसरामध्ये नवीन अधिकारी आल्यानंतर काही स्वयंघोषित पत्रकारांचा वेगळा फंडा

लोणी काळभोर परिसरामध्ये नवीन अधिकारी आल्यानंतर काही स्वयंघोषित पत्रकारांचा वेगळा फंडा

    लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण व

    सार्वजनिक ठिकाणी सर्रास सुरु असलेले अवैध धंदे, युवकांची बाईक रायडींग, शाळेबाहेर असलेले रोड रोमिओ यांचा उच्छाद या सर्व अडचणीनींना कंटाळून लोणी काळभोर परिसरामधील नागरिकांच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या असल्यामुळे काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून लोणी काळभोरला लाभलेले करणकोट यांची तात्काळ बदली करण्यात आली. अनेक ठिकाणी गुन्हेगारीचे देखील थैमान या लोणी काळभोर भागामध्ये वाढले होते.तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या बदली नंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून राजेंद्र पन्हाळे यांची नेमणूक करण्यात आली. नवनियुक्त पोलीस निरीक्षक पन्हाळे यांच्याकडून लोणी काळभोर परिसर भयमुक्त, सुरक्षित व्हावा अशी अपेक्षा आहे.याठिकाणी असलेले काही स्वयंघोषित पत्रकार आपल्या पोर्टलच्या माध्यमातून कोणत्याही बातमीची शहानिशा न करता ब्रेकिंग न्यूज साठी खोट्या अफ़वा पसरवणाऱ्या बातम्या करून समाजाची दिशाभूल करत आहे आणि प्रशासनाला वेठीस धरून आपले काम साध्य करतात व त्यामागून अनधिकृत धंद्याना पाठबळ देतात अश्या पत्रकारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

     

     

    ( काही वर्षांपूर्वी एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यावर काही गुंड प्रवृत्ती च्या लोकांनी हल्ला देखील केला होता यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून एक स्वयंघोषित पत्रकार देखील सामील होता या पत्रकारानी स्वतःला वाचवण्यासाठी एक न्यूज पोर्टल चालू केला आणि त्या पोर्टलच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत बसवण्याचा प्रयत्न करीत आहे शासकीय प्रशासकीय यंत्रणेवर दबाव यंत्रणा वापरायचा प्रयत्न सध्या चालू आहे. यामुळे पोलीस प्रसाशन देखील त्रस्त आहे. त्या स्वयंघोषित पत्रकारावर कारवाई लवकरच होईल अशी काही सामाजिक संघटनेने ग्वाही दिलेले आहे)

     

    लोणी काळभोर स्टेशन परिसरामध्ये अनेक मटक्याचे धंदे आहेत परंतू या मटक्याच्या धंद्याचा ” आका ” कोण आहे ? व या ‘ आका ‘च्या मार्गदर्शनाखाली अनेक वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांच्या नावावर ते मटक्याचे धंदे चालवत असल्याचीही चर्चा आहे, या सर्व गोष्टी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या कानावर आल्यानंतर त्या सामाजिक कार्यकर्त्याने या सर्व गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न देखील केला असता त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यावर प्राण घातक हल्ला होतो आणि हल्ला झाल्यानंतर तो पत्रकार काही वर्षांपूर्वी त्या गुन्ह्यात दबाव यंत्रणा वापरतो तसेच काही चांगले शासकीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना,देखील त्रास देण्याचा प्रयत्न लेखणीच्या माध्यमातून गैरवापर करून करत आहे व नाव बदनाम करण्याचे प्रयत्न लेखणीच्या माध्यमातून अनेक वेळेस होत आहे

    लवकरच अशा स्वयंघोषित पत्रकारितेच्या नावा वर मटक्याचा धंदा चालवणाऱ्या ला व प्राधान्य देणाऱ्या आणि समाजामध्ये मी धुतलेल्या तांदळाचा आहे असा सांगणाऱ्या पत्रकारावर लवकरच कारवाई होणार..! हे नक्की..

    एक सामाजिक संघटना या संघटनेचे नाव पुढच्या बातमी मध्ये

    लोणी काळभोर प्रतिनिधी_

    (महाराष्ट्र क्राईम वॉच दिगंबर जोगदंड)

     

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *