• January 18, 2025
  • No Comment

ट्रकचालकाची एक चुक आणि 9 वर्षीय चिमुरडीला गमवावा लागला आपला जीव

ट्रकचालकाची एक चुक आणि 9 वर्षीय चिमुरडीला गमवावा लागला आपला जीव

हडपसर (पुणे): चर्चमध्ये प्रार्थना केल्यानंतर आईसोबत दुचाकीवर घरी परतणाऱ्या चिमुरडीला ट्रकचालकाच्या चुकीमुळे जीव गमवावा लागला आहे. भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेसह तिची दोन्ही मुले खाली पडली.

ट्रकचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेल्यामुळे आईच्या डोळ्यासमोर 9 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना 15 जानेवारीला रात्री सव्वा नऊच्या सुमारास हडपसरमधील भोसले गार्डनसमोर घडली. अपघातात महिलाही जखमी झाली असून, ट्रकचालकाला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

निशा प्रल्हादकुमार शर्मा (वय 9,रा. फुरसुंगी, हडपसर) असे मृत मुलीचे नाव आहे. संध्याकुमारी शर्मा (वय 30) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नीलेश बाबासाहेब बटुळे (वय 25, रा. अहिल्यानगर) असेट्रकचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकुमारी आणि त्यांची मुलगी निशा, मुलगा शिवांशू शर्मा हे 15 जानेवारीला संध्याकाळी आठच्या सुमारास घोरपडीतील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. त्याठिकाणी प्रार्थना संपल्यानंतर तिघेही माय-लेकरे दुचाकीवरून फुरसुंगीला घरी जात होते. सव्वानऊच्या सुमारास संध्याराणी दुचाकीवरून भोसले गार्डनसमोरून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे तिघेही खाली पडल्यानंतर 9 वर्षीय निशाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. आईच्या डोळ्यांदेखतच निशाचा जीव गेला. अपघातात संध्याराणीही जखमी झाल्या आहेत. दरम्यान, पसार होण्याच्या तयारीतील चालक नीलेशला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगर तपास करीत आहेत.

Related post

सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीचे मजरीमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करणाऱ्या तहसीलदारासह ६ जणांना बेड्या

सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीचे मजरीमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत…

पेण: इतिहासात असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वराज्याची स्थापना केली, त्यापैकी एक,नरवीर सरदार वाघोजी तुपे,नामदार खान हा अबझल खाणाचा मावसभाऊ…
इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट समितीवर वाळुंजकर यांची नियुक्ती 

इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट समितीवर वाळुंजकर यांची नियुक्ती 

पिंपरी: कौशल्य विकास, नाविन्यता व रोजगार विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवरती मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार सदस्यांची…
पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला साताऱ्यात ठोकल्या बेड्या

पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला साताऱ्यात…

पुणे: पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा याला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. ८ मार्च रोजी सकाळी भर चौकात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *