• January 18, 2025
  • No Comment

सिंहगड रस्त्यावर चंदन चोरी करणारा गजाआड, सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी

सिंहगड रस्त्यावर चंदन चोरी करणारा गजाआड, सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी

    पुणे: सिंहगड रस्ता भागात एका बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपयांचे चंदनाची झाडाचे ओंडके जप्त करण्यात आले.

    भरत शिवाजी जाधव (वय ३४, रा. केडगाव चौफुला, गडदे वस्ती, ता. दैांड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

    धायरी भागातील एका बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. सिंहगड रस्ता पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. वडगाव भागातील कॅनॉल रस्त्यावर एक जण थांबला असून, त्याच्याकडील पोत्यात चंदनाचे ओंडके असल्यााची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडील पोत्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा पोत्यात चंदनाचे १,०००,००/- रु.किं.चे अर्धवट तोडलेले चंदनाच्या झाडाचे तुकडे मिळुन आले.

    चंदन चोरटा जाधव याच्याविरुद्ध यापूर्वी यवत आणि हवेली पोलीस ठाण्यात चंदन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते.

    सदरची कामगिरी मा.अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परी – ३, पुणे श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग श्री. अजय परमार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम,

    पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक मोहीते, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, स्वप्निल मगर, यांनी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *