- January 18, 2025
- No Comment
चक्क बालकाकडुन चोरी, घरफोडीचे गुन्हे, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत, भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

भारती विद्यापीठ: भारती विद्यापीठ परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बालकाकडुन १ चैन (साखळी) चोर तसेच २ घरफोडी चे गुन्हे केलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलीसांनी ताब्यात घेतल आहे. आरोपी बालकाकडुन एकुण २,००,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत केला.
गुन्हे रेकॉर्ड वरील बालक व त्याचे साथीदार (नाव नमुद नाही). आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतल आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अभिलेखावरील जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ०३ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ ( ५ ) या चैन स्नॅचिंगचे गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने, त्याचा शोध घेत असताना तो बालक कात्रज कोंढवा रोडवरील पेरुची बाग येथे त्याच्या जवळ असलेल्या मोटार सायकलसह मिळुन आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले.
बालकाकडे अधिक चौकशी दरम्यान त्याच्यावर भारती विद्यापीठ कडील एकूण ४ गुन्हे उघडकीस आले असुन १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दुचाकी वाहन असे एकुण २,००,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील मा.पोलीस उप आयुक्त परि. २, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग,पुणे.श्री.राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता देवकाते, श्री. राहुल कुमार खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश निलेश खैरमोडे, सचिन गाडे, यांच्या पथकाने केली.