• January 19, 2025
  • No Comment

कीरकोळ कारणावरून पिता-पुत्राला बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

कीरकोळ कारणावरून पिता-पुत्राला बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

    पिंपरी; पिता-पुत्राला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना पिंपरीतील लक्ष्मी मार्केट येथे घडली. याप्रकरणी रोहित विशाल वावरे (रा. रेल्वे स्थानकाशेजारी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

    त्यानुसार अमर रणजीत कदम (वय २६), राहुल रणजीत कदम (वय ३५) व बबलू रणजीत कदम (वय ३०, सर्व रा. लक्ष्मी मार्केट, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे वडील हे त्यांचे चावीचे दुकान बंद करीत असताना दुकानासमोर राहणारे आरोपी तेथे आले. ‘गाणी कोण वाजवतेय’ असे म्हणत शिवीगाळ करीत असताना फिर्यादीच्या वडील म्हणाले की, गाणी वाजवणारी मुले निघून गेली. या कारणावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांनी अमर कदम यास वडिलांना शिव्या का देतोस असे म्हणाले असता, त्याने फिर्यादी यांनाही शिवीगाळ करून टोकदार टोच्याच्या साहाय्याने कपाळावर मारून जखमी केले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *