- January 19, 2025
- No Comment
काळेवाडीत जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; तीन पत्ती खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल
काळेवाडी: गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई केली. तीन पत्त्यांचा जुगार खेळत असलेल्या सात जणांवर गुन्हा दाखल केला. अमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडी येथील तापकीरनगर झोपडपट्टीत ही कारवाई केली.
कालीदास ज्ञानेश्वर दिवसे (४४, रा. गावडे भोईर आळी, चिंचवडगाव), नथुराम शंकर बनकर (५६, रा. औंध, पुणे), सूरज भास्कर पाटील (३१, रा. थेरगाव), देवराम आत्माराम रागपसरे (३३, रा. आनंदनगर, चिंचवड), सुनील मधुकर ढोकळ (५४, रा. पाचपीर चौक, काळेवाडी), कबीर मुनीर सय्यद (४५, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, नेहरुनगर, पिंपरी), अक्षय सुरेश गुंजेकर (३१, रा. भारतमाता चौक, काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील भारत माता चौकात जुगार अड्डा सुरू असल्याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. संशयित हे २० हजार रुपयांसह तीन पत्ती जुगार खेळताना मिळून आले. हा जुगार कोण चालवतो, असे पोलिसांनी विचारले. बिंदू यादव हा जुगार चालवतो, असे आरोपींनी सांगितले.
पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.