• January 19, 2025
  • No Comment

खाजगीतील व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर केला व्हायरल, वानवडी पोलीसांकडून आरोपी अटकेत

खाजगीतील व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर केला व्हायरल, वानवडी पोलीसांकडून आरोपी अटकेत

    पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्नानगृहात फ्रेश होण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून तो इंन्टाग्रामवर प्रसारीत केला. त्यानंतर व्हिडीओ इंन्टाग्रामवरून काढून टाकण्यासाठी पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत 30 हजार रुपये मागीतल्याची घटना समोर आली आहे.

    पीडित महिलेने तत्काळ वानवडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी कृष्णा संपत शिंदे (वय. २० वर्षे, धंदा केटरिंग, रा. चव्हाण मळा झोपडपट्टी, बिटको पोलीस चौकीच्या पाठीमागे, नाशिक रोड, नाशिक) यास नाशिक येथून अटक केली आहे.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या त्यांच्या राहत्या घरी पत्र्याचे शेड असलेलया स्नानगृहात अर्धनग्न अवस्थेत फ्रेश होण्यासाठी गेली असता त्या महिलेचा खाजगीतील व्हिडीओ आरोपी कृष्ण संपत शिंदे याने त्याचेकडील मोबाईलद्वारे शुट केला. तसेच तो व्हिडीओ आरोपीने इंन्टाग्राम या सोशल मिडीयावर व्हायरल सुद्धा केला. सदर व्हिडीओबाबत पिडीत महिलेस माहिती मिळाल्याने आरोपी संपत शिंदेला विचारणा केली, परंतु त्याने तो व्हिडीओ डिलीट करुन काढण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची किंवा ३० हजार रुपये रोख रक्कमेची मागणी केली. त्यामुळे पिडीत महिलेने वानवडी पोलीस ठाणे येथे धाव घेतली . पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.

     

    गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची वेगाने सुत्र फिरून पोलीस अंमलदार अमोल पिलाणे व अतुल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण करुन सोशल मिडीयाबाबत माहिती घेतली आणि वानवडी पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार अमोल पिलाणे व गोपाळ मदने हे आरोपीचा माग काढत नाशिक येथे पोहचले.

    नाशिक येथुन आरोपी कृष्णा संपत शिंदे यास नाशिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली. आरोपी कृष्णा शिंदेकडे तपासणी केली असता त्यास पैशाची गरज असल्यामुळे त्याने पिडीत महिलेचा खाजगीतील व्हिडीओ शुट करुन तो बनावट इन्स्टा आयडी तयार करुन व्हायरल केला आणि तो डिलीट करण्यासाठी पिडीतेकडून ३०,हजार रुपयांची मागणी केली व ते न दिल्यास शरीर सुखाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

    गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे हे करीत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *