• January 19, 2025
  • No Comment

चक्क पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त

चक्क पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त

    पुणे: पुण्यात कोयत्याने दहशत माजावणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता पुण्यातील विविध ठिकाणाहून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 7 पिस्तूल जप्त केले आहेत. या सर्व 7 पिस्तूल आणि त्यासोबत असलेले जिवंत काडतुसे वापरणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

    या 9 जणांचे पिस्तूल बाळगण्यासाठीचे अनेक कारणे समोर आली आहेत. काही जणांनी जमिनीच्या वादातून स्वतःचे रक्षण करण्यासाठी पिस्तूल विकत घेतले आहेत, तर काही जणांनी वर्चस्व राहावं यासाठी या पिस्तूल खरेदी केल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे.

     

    विशेष म्हणजे हे सर्व पिस्तूल मध्य प्रदेशमधून अगदी कमी किंमतीत आणलं जात असून पुढे याची विक्री लाखो रुपयांमध्ये होते हे सुद्धा समोर आलं आहे. या प्रकरणात सागर ढेबे या तरुणासह इतर 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर ढेबेवर याआधी पुण्यातील अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

    पुण्यात आज पकडलेल्या 7 पिस्तूलची किंमत जरी 2 लाख 86 हजार असेल तर ती मुख्य आरोपीने इतरांना कितीला विकली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या निमित्ताने पुण्यात गुन्हेगारांच्या हाती पिस्तूल येण्याचे मध्य प्रदेश कनेक्शन सुद्धा समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ याच्या हत्येच्या बदला आणि कोथरूडमध्ये वर्चस्व राहावं यासाठी तरुणांनी जे पिस्तूल आणलं होतं ते सुद्धा मध्य प्रदेश मधूनच आणले होते.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *