• January 19, 2025
  • No Comment

शेअर मार्केटच्या नावाने अनेकांना लाखोंचा गंडा; तीन टोळकी जेरबंद

शेअर मार्केटच्या नावाने अनेकांना लाखोंचा गंडा; तीन टोळकी जेरबंद

    पिंपरी-चिंचवड: शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक करण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार समोर आला असला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही जणांना पुणे जिल्ह्यात आणून बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

    शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाने फसवणुकीचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. त्यानुसार पुण्यात समोर आलेल्या प्रकरणात सायबर पोलीसांनी शेअर मार्केटच्या नावाने नागरिकांना लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घालणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात रोहीत पटाडीया, विशाल कदम आणि रमजान सदिक चौहान या तीन आरोपींना सायबर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर मुख्य आरोपी सुरज खेडेकर हा अद्याप फरार असुन त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

    पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या सर्व आरोपी मिळून पिंपरी चिंचवड शहरातील एका गुंतवणूकदाराला ६७ लाख ६९ हजार ९५० रुपये वेगवेगळ्या बँके अकाउंटमध्ये जमा करायला लावले. या माध्यमातून लाखो रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

    शेअर मार्केटच्या नावाने लाखो रुपयांचा फायनान्शिअल फ्रॉड करण्यासाठी राजस्थान मधील नागोर गावातील व्यक्तींना पुणे जिल्ह्यात आणून, बनावट कागदपत्रांच्या द्वारे त्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरा सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *