- January 20, 2025
- No Comment
पुणे गावाकडील जमिनीवर नंणदचे नाव लागल्याने पत्नीकडून पतीला मारहाण

पुणे : वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये आपल्या बहिणींना वाटा देण्यास अनेक भाऊ नाखुश असतात. मात्र, आता कायद्यापुढे ते काही करु शकत नाही. मात्र, इथ वेगळाच प्रकार घडला. वडिलांच्या मृत्युनंतर गावाकडील जमिनीवर नंणदेचे नाव लागल्याच्या कारणावरुन पत्नीने पतीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत महादेव तुकाराम खांडेकर (वय ४५, रा. पंचगंगा सोसायटी, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांची पत्नी संध्या महादेव खांडेकर (वय ३५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी सव्वा दहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांच्या मृत्युनंतर गावाकडील जमिनीवर त्यांच्या बहिणींची नावे लागली. या कारणावरुन पतीपत्नीत वाद झाला. तेव्हा पत्नीने पतीला धमकी देऊन हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळी शेजारचे बोट रात ओढून व हिसका देऊन बोट मोडून जबर दुखापत केली. पोलीस हवालदार देशमुख तपास करीत आहेत.




