• January 20, 2025
  • No Comment

लोणी काळभोरमधील घटनेत उसने पैसे मागण्यावरुन खून करणाऱ्याला आरोपीस 7 वर्षाची शिक्षा 6 वर्षांची निकाल

लोणी काळभोरमधील घटनेत उसने पैसे मागण्यावरुन खून करणाऱ्याला आरोपीस  7 वर्षाची  शिक्षा 6 वर्षांची निकाल

    पुणे : उसने पैसे मागण्यावरुन दगड व काठीने मारहाण करुन जीवे ठार मारल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला ७ वर्षाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी पी जाधव यांनी हा निकाल दिला आहे. भिमराव यशवंत खांडे (वय ५५, रा. वडकी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर, चंद्रकांत शंकर चव्हाण असे खुन झालेल्याचे नाव आहे. ही घटना वडकी येथे १७ एप्रिल २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. उसने पैसे मागण्याच्या कारणावरुन भिमराव खांडे याने चंद्रकांत चव्हाण यांना दगड व लाकडी काठीच्या सहाय्याने जीवे ठार मारले. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप कुमार यांनी गुन्ह्याचा तपास करुन

    भिमराव खांडे याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सहायक सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी कामकाज पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून ललिता कानवडे यांनी सहाय्य केले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने भिमराव खांडे याला सात वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी या कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून कोर्ट पैरवी ललिता कानवडे, समन्स वॉरंट अंमलदार प्रशांत कळसकर, केस दत्तक अंमलदार रेश्मा कांबळे व तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना १० हजार रुपयांचे बक्षिस मंजूर केले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *