- January 20, 2025
- No Comment
बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून पिंपरी चिंचवड शहरातील एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न. आरोपींना तात्काळ अटक

पुणे: बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून पिंपरी
चिंचवड शहरातील एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या आत्महत्येच्या प्रयत्नात कुटुंबातील एक महिला आणि एका चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
आता या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलिसांनी
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चारही आरोपीना तात्काळ अटक केली आहे. संतोष कदम, सुरेखा कदम, संतोष पवार आणि जावेद खान या चारही आरोपींन विरोधात पोलिसांनी चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 352 351 (2) 3 ( 5 ) आणि सावकारी अधिनियम कायदा 39, 45 कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे