• January 20, 2025
  • No Comment

पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीची फसवणुक लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या

पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीची फसवणुक लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या

पुणे : पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोपट बाबुराव फडतरे (वय ५८, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुलदिप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीत ७ जानेवारी रोजी घडली होती. पल्लवी पोपट फडतरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुलदिप सावंत याने लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे भासवुन नोंदणी केली. फिर्यादी यांना तो देहु येथे समक्ष जाऊन भेटला. फिर्यादी यांना त्याचे वागणे व आरोपीचा दवाखाना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी कुलदिपला नकार कळविला होता. असे
असताना फिर्यादींच्या अपरोक्ष त्याने त्यांच्या मुलीशी पल्लवीशी संपर्क साधला. तिला लग्नाचे आमिष दाखविले. पल्लवी ही बीएमएसएच झाली असून तिचे तुळजाभवानी सोसायटीत क्लिनिक आहे. कुलदिप याने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिने लग्नाचा
विषय काढल्यावर आपले लग्न झाले असून आपली पत्नी गर्भवती
असल्याचे सांगितले. याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला. तिने त्याच्याकडे १० लाख रुपये परत करण्याची मागणी केली. परंतु, तो टाळाटाळ करु लागला. तेव्हा तिने चिठ्ठी लिहून आपल्या क्लिनिकमध्ये विषारी औषध घेतले. ही बाब समजल्यावर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना ८ जानेवारी रोजी तिचा मृत्यु झाला.
याबाबत पोपट फडतरे यांनी सांगितले की, कुलदिप सावंत याने आपल्या मुलीची फसवणूक केली आहे. तिच्यापासून आपले लग्न झाल्याचे लपवून ठेवले.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *