- January 20, 2025
- No Comment
दही हंडी उत्सवात गोळीबार करणाऱ्या टोळीतील तडीपार अट्टल गुन्हेगारास अटक त्याच्याकडून सिंहगड रोड पोलिसांनी दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त

पुणे : दही हंडी उत्सवात गोळीबार करणाऱ्या टोळीतील तडीपार अट्टल गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
बाळु धोंडिबा ढेबे (वय २७, रा. राम मंदिराजवळ, जनता वसाहत) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. सिंहगड परिसरात दहीहंडी दरम्यान एका गुंड टोळीने हवेत गोळीबार करुन दहशत माजविली होती. यात ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. टोळीप्रमुख चेतन ढेबे याच्यासह बाळु ढेबे याचा समावेश होता. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या
टोळीवर मोका कारवाई केली होती. मोकातून जामीन मिळाल्यावरही बाळु ढेबे याची गुन्हेगारी कृत्ये न थांबल्याने पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी बाळु ढेबे याला ऑक्टोंबर २०२४ मध्ये तडीपार केले होते. असे असतानाही तो शहरात येऊन रहात होता. सिंहगड पोलीस ठाण्याचे तपास पथक १६ जानेवारी रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार आण्णा केकाण, राहुल ओलेकर व विनायक मोहिते यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली की, तडीपार गुंड बाळु ढेबे हा स्वामी नारायण मंदिर परिसरातील व्हीजन स्कुलच्या पाठीमागील रोडवर थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. या बातमीची खात्री करुन पोलीस मिळालेल्या माहितीनुसार तेथे गेले. पोलिसांना पाहून
बाळु ढेबे पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी काही अंतर त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ८० हजार रुपयांचे दोन गावठी पिस्टल व २ हजार रुपयांचे २ जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे दिलीप दाईगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक मोहिते, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास
पांडुळे, विकास बांदल, स्वप्निल मगर यांच्या पथकाने केली आहे.




