• January 20, 2025
  • No Comment

पुणे चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने केला खुन

पुणे चारित्र्याच्या  संशयावरुन पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने केला खुन

    पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेश्माभिकु खुडे (वय ३२, रा. कुटे मळा, मानाजीनगर, नन्हे मुळ रा. वडुज, जि. सातारा) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मुळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. ही घटना नऱ्हेमधील मानाजीनगर येथील कुटे मळा येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा खुडे हिचे पहिले लग्न झाले होते. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. त्यानंतर तिने कुमार

    पाटील बरोबर लग्न केले. एक महिन्यांपूर्वीच ते नऱ्हेमध्ये रहायला आले होते. कुमार पाटील हा सासवड येथील एका लॉजवर कामाला आहे. तो एक-दोन दिवसांनी घरी येत असतो. शुक्रवारी सायंकाळी कुमार कामावरुन घरी परत आला होता. त्यावेळी त्याचे रेश्मा हिच्या चारित्र्याच्या संशयावरुन त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा त्याने रागाच्या भरात रेश्मा हिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळला. त्यात तिचा जागीच मृत्यु झाला.

    या दोघांचा आरडाओरडा ऐकून घरमालक तेथे आले होते. त्यांनी घराचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना रेश्मा निपचित पडली होती. हे पाहून त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी कुमार पाटील याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *