• January 20, 2025
  • No Comment

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप

    कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं. आता या प्रकरणी आज सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालाआधी दिवसभर जी सुनावणी पार पडली त्यात हे प्रकरण दुर्मिळातलं दुर्मीळ आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. ९ ऑगस्ट २०२४ ला कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. रुग्णालयाच्या टाऊन हॉलमध्ये या डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. हे क्रौर्य पाहून पोलीस आणि शवविच्छेदन करणारे डॉक्टरही हादरले होते. तसंच पुढील दीड महिना या महाविद्यालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान या प्रकरणी न्यायाधीश अनिर्बान दास यांनी निकाल दिला आहे. ते २.४५ ला न्यायालयात आले. त्यानंतर त्यांनी हा निर्णय दिला.

    कोर्टात आर. जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सरकारी वकिलांनी हे म्हटलं आहे की ज्या प्रकरणांमध्ये आरोपींच्या सुधारणेला काहीही वाव नाही अशा प्रकरणांसाठी फाशीची शिक्षा राखीवच ठेवली पाहिजे. तर दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी आरोपीचं मानसिक आरोग्य ठीक नसल्याची कारणं दिली आणि फाशीची शिक्षा देण्याऐवजी पर्यायी शिक्षा देण्यात यावी असं म्हटलं होतं. सियालदह न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. संजय रॉयला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *