• January 21, 2025
  • No Comment

नराधम केअर टेकरने मनोरुग्ण महिलांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेत केला लैंगिक अत्याचार

नराधम केअर टेकरने मनोरुग्ण महिलांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेत केला लैंगिक अत्याचार

    पुणे : संस्थेमध्ये नेमलेल्या केअर टेकरने मनोरुग्णाची काळजी घेणे अपेक्षित असते. परंतु, तेथील एका नराधम केअर टेकरने या महिलांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    याबाबत एका ३८ वर्षाच्या पिडितेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका ३४ वर्षाच्या केअर टेकरला अटक केली आहे. ही घटना ३ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान संस्थेमध्ये घडली.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी या संस्थेत केअर टेकर म्हणून नोकरीला आहे. संस्थेतील महिलांना सहाय्य करणे, त्यांना मदत करण्याचे काम त्याच्याकडे होते. असे असताना त्याने या ३८ वर्षाची महिला रहात असलेल्या रुममध्ये जाऊन कोणी नसताना रुमच्या दरवाजाची कडी लावून पीडिता ही मनोरुग्ण आहे, हे माहित असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार ३ ते १० जानेवारी दरम्यान सुरु होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *