• January 21, 2025
  • No Comment

फुरसुंगी घरावर कर्ज काढून देतो, असे सांगून घरावरच ताबा

फुरसुंगी घरावर कर्ज काढून देतो, असे सांगून घरावरच ताबा

    पुणे : घरावर कर्ज काढून देतो, असे सांगून घराची कागदपत्रे घेऊन कर्ज काढून न देता, घर खरेदी करण्याचा बहाणा करुन ११ महिन्यांचा भाडेकरार करुन घराचा ताबा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

    याबाबत अंकुश हनुमंत पवार (वय ३३, रा. रामनगर, रामटेकडी, वानवडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नितीन अशोक गायकवाड (वय २९, रा. संकेत विहार स्वराज्यनगर, फुरसुंगी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार संकेत विहार येथे ३ एप्रिल २०२२ पासून १८ जानेवारी २०२५ दरम्यान घडला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चालक म्हणून काम करतात. त्यांचे संकेत विहार येथे घर आहे. सध्या ते रामटेकडी येथे भाड्याच्या घरात राहतात. आरोपी नितीन गायकवाड यांनी अंकुश पवार यांना घरावर बँकेकडून कर्ज काढून घेतो, असे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. घराची कागदपत्रे घेतली. कर्ज काढून न देता फिर्यादी यांचे घर खरेदी करण्याचा बहाणा केला. त्यासाठी दोन वेळा इसार पावती करुन ११ महिन्याचा भाडेकरार करुन त्या घरात रहात आहे. इसार पावतीमध्ये ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण न करता घराचा ताबा घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *