• January 21, 2025
  • No Comment

लोणी काळभोर दस्त करुन देण्याच्या बहाण्याने एका तीस वर्षीय महिलेचा विनयभंग

लोणी काळभोर दस्त करुन देण्याच्या बहाण्याने एका तीस वर्षीय महिलेचा  विनयभंग

    दस्त करुन देण्याच्या बहाण्याने एका तीस वर्षीय महिलेला एका हॉटेलमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना कवडीपाट येथे घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संजय नामदेव झुरुंगे (वय ५५, रा. मांजरी, ता. हवेली, जि. पुणे), तसेच संतोष बापू गायकवाड (वय ४५, रा. शिंदवणे ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या संदर्भात एका ३० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झुरुंगे व गायकवाड या दोघांनी संगनमत करून पीडितेला रद्दखताचा दस्त करुन देण्याचे आमिष दाखवून चर्चेसाठी कवडीपाट टोलनाका परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. पीडित महिला तेथे आल्यानंतर झुरुंगे व गायकवाड या दोघांनी तिचा विनयभंग केला. तसेच तिला शिवीगाळ करून अँट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस अधिक तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *