• January 21, 2025
  • No Comment

पुण्यात एअर होस्टेस युवतीला लॉजवर घेऊन जात केला अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात एअर होस्टेस युवतीला लॉजवर घेऊन जात केला अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड परिसरात एका एअर होस्टेस युवतीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित युवतीचे अनेक खासगी व्हिडीओज आणि फोटोज शूट केले होते. याच्या आधारे आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता.

    शिवाय, आरोपीने पीडित युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    संबंधित अश्लील फोटो घरच्यांना पाठवेन, अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून युवतीने पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल करत हे प्रकरण पुण्यातील वाकड पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे. याप्रकरणी वाकड पोलिस पुढील तपास करत आहेत.

     

    पीडित युवती (वय २१) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडवली येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी एअर होस्टेसचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती. पुण्यातील वाकड परिसरात ती आपल्या एका मैत्रीणीसोबत राहत होती. यावेळी तिची ओळख मैत्रीणीचा भाऊ विजय आबासाहेब शिंदे या युवकासोबत झाली. काही दिवसांत दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर आरोपी युवकाने एअर होस्टेसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर जबरदस्तीने डांगे चौक येथील लॉजवर आणि रुमवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. शिवाय, त्याने पीडित युवतीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले.

    पीडित युवतीचे अश्लील फोटो घरच्याना पाठवेन, अशी धमकी देत आरोपीने पीडितेला वारंवार ब्लॅकमेल केले. यानंतर पीडित युवतीने अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून रविवारी रात्री उशिरा पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विजय शिंदे याच्याविरुद्ध शून्य एफआयआर नोंदवला. यानंतर पैठण पोलिसांनी हे प्रकरण वाकड पोलिस स्टेशन (पिंपरी चिंचवड पुणे) कडे वर्ग केला आहे. वाकड पोलिस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *