• January 20, 2025
  • No Comment

बोपघाट, ट्रिनिटी कॉलेज परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली ‘धिंड’

बोपघाट, ट्रिनिटी कॉलेज परिसरात दहशत माजविणाऱ्या  गुंडांची पोलिसांनी काढली ‘धिंड’

    पुणे : ट्रिनिटी कॉलेज, बोपदेव घाट परिसरात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॉलेज बाहेरील रोडवर तरुणाला कोयत्याने मारहाण करणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्र व वाहने असा ३ लाख ८० हजारांचा माल जप्त केला आहे.

    भावेश बाळासाहेब कुंजीर (वय २३, रा. सासवड), अथर्व कैलास पवार (वय २१, रा. बी टी कवडे रोड, दळवीनगर, घोरपडी), सुरज सचिन राऊत (वय २१, रा. सासवड- बोपदेव घाट रोड, येवलेवाडी), आर्यन विलास पवार (वय १८, रा. ओम सोसायटी, दळवीनगर, घोरपडी), सौरभ प्रदिप लोंढे (वय १८,रा. संदेश सहकारी सोसायटी, संभाजीनगर, धनकवडी, मुळ रा. सातेफळ,ता. कळंब, जि. धाराशिव), राज दिगंबर रोंगे (वय १९, रा. सिंगापूर होम्स,

    येवलेवाडी), वरुण बबन भोसले (वय २१, रा. आनंदनगर, जेजुरी ता. पुरंदर) अशी केलेल्यांची नावे आहेत. ट्रिनिटी कॉलेजसमोरील रोडवर १६ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता विश्वजित बाबाजी हुलवळे (वय १९, रा. येवलेवाडी) याला कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी केले होते. त्यावरुन कोंढवा पोलिसांनी खुनाचा

    प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना १८ जानेवारी रोजी पोलीस हवालदार सतिश चव्हाण व विशाल मेमाणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी हे राज रोंगे याच्या येवलेवाडीतील सिंगापूर

    होम्स येथे लपले आहेत. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन घरावर छापा घालून सातही आरोपींना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे व वाहने असा एकूण ३ लाख ८० हजारांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस

    निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रौफ शेख, सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार अमोल हिरवे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, पोलीस अंमलदार संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, सुरज शुक्ला, सागर भोसले, सुजित मदन, राहुल थोरात यांच्या पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *