• January 22, 2025
  • No Comment

धक्कादायक! कात्रीने गळ्यावर वार करुन केला पत्नीचा खुन; खराडीमधील पहाटेची घटना

धक्कादायक! कात्रीने गळ्यावर वार करुन केला पत्नीचा खुन; खराडीमधील पहाटेची घटना

    खराडी (पुणे): घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणार्‍या पतीने कात्रीने गळ्यावर वार करुन पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे.

    ज्योती शिवदास गीते (वय २८, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) असे खुन झालेल्या पत्नीचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) याला अटक केली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे साडेचार वाजता घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास गीते हा मुळचा बीडचा राहणारा आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो. तुळजाभवानी नगर येथे तो भाड्याने रहात आहे. पतीपत्नीमध्ये घरगुती कारणावरुन भांडणे होत होती. आज पहाटे यांच्यात याच कारणावरुन भांडणे झाली. त्यात शिवदास याने घरातील कात्रीने ज्योती हिच्या गळ्यावर वार करुन खुन केला. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले़ त्यांनी शिवदास गीते याला ताब्यात घेतले असून ज्योती हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे़.

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *