• January 23, 2025
  • No Comment

पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने केली प्रियकराची हत्या; आरोपी गजाआड

पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने केली प्रियकराची हत्या; आरोपी गजाआड

पिंपरी-चिंचवड: प्रियकर सतत मानसिक त्रास देत असल्याने प्रेयसीने मित्रांच्या मदतीने हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या प्रकरणी गुंडाविरोधी पथकाने या कटात सहभागी असलेल्या तिघांसह महिलेला आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आहे.

बालाजी उर्फ बाळू मचक लांडे असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. रेखा विश्वंभर भातनासे असे आरोपी प्रेयसीचे नाव आहे. तिच्या अल्पवयीन मुलीला देखील हत्येप्रकरणी आरोपी करण्यात आलं आहे. आधी हे हत्या प्रकरण अपघात आहे असा बनवा रचण्यात आला होता. पण गुंडाविरोधी पथकामुळे आरोपींचा बनाव उघड झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ जानेवारी रात्री पावणेनऊ वाजता. प्रेयसी रेखाने बालाजीच्या हत्येचा कट रचला. आधीच रुमध्ये काही मित्रांना बोलवण्यात आलं. तिथं बालाजी येताच त्याच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलं. अपघात असल्याचा बनाव रचून त्याला वायसीयम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारापूर्वीच बालाजीचा मृत्यू झाला. हत्या झालेल्या बालाजीचा अपघात झाल्याचा बनाव रचून त्याला वासीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. दरम्यान, आरोपी रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे यांच्यासह इतरांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट नाव सांगितली होती. ही बाब लक्षात येताच पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी समांतर तपास करण्याबाबत सूचना दिल्या. गुंडाविरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी आजूबाजूचे अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तोच धागा चिखलीतील दुर्वांकुर सोसायटीपर्यंत पोहोचला. सोसायटीच्या लिफ्टमध्ये काही रक्ताचे डाग देखील आढळले. पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. फ्लॅट नंबर ३०३ मध्ये अल्पवयीन मुलगी दिसली. तिला पोलिसांनी विश्वासात घेऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीचा फोटो दाखवला आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचे नाव बालाजी उर्फ बाळू मचक लांडे असे असल्याचं समोर आलं आणि तो बीडमधील दिंदृडचा रहिवाशी असल्याचं तपासात पुढे आल. तसेच मुलीची आई रेखा विश्वभंर भातनासे आणि इतर चार साथीदारांनी हत्या केली असल्याचे देखील कबूल केलं. रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे यांना ताब्यात घेतलं असून इतर तीन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एक टीम बीडला रवाना झाली आहे.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *