• January 23, 2025
  • No Comment

पुण्यातील हुक्का पार्लरवर छापा; पोलिसांची धडक कारवाई

पुण्यातील हुक्का पार्लरवर छापा; पोलिसांची धडक कारवाई

    पुणे: कोरेगांव पार्क मधील हुक्का पार्लर अन् बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. लेन नं. ७ मधील पॉवर प्लाजा बिल्डिंगमधील हॉटेल पाल्मोकोवर ही कारवाई केली आहे.

    याप्रकरणी शिवा वासुदेव सरकार (वय ३२, रा. वडगाव शेरी), शाहीद निशार अहमद हुसेन (वय २१, रा. कोरेगाव पार्क) आणि नबिल मकसुद पिरजादे (वय ३०, रा. वारजे माळवाडी), इम्रान मोहम्मद गौस रेहाली (वय ३३, रा. वडगाव शेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार प्रविण सुधीर पडवह यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई हॉटेल पाल्मोका येथे रविवारी सायंकाळी पावणे आठ वाजता करण्यात आली.

    पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी कोरेगाव पार्क येथील लेन नं ५, ६, ७ मध्ये पायी पेट्रोलिंग करत नागरिकांशी संवाद साधला. अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना या अडचणी सोडविण्यासोबतच कारवाईचे देखील आश्वासन दिले. तेव्हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पथक लेन नंबर ७ मध्ये पेट्रोलिंग करताना हॉटेल पाल्मोको मध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधील टेबलवर हुक्का पॉट, तंबाखुजन्य अल फकेर व रॉयल स्मोकीन नावाचे हुक्का फ्लेवर असा २२ हजार ९६ रुपयांचा माल ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या विक्रीकरता ठेवलेला दिसून आला. त्याचप्रमाणे दारु विक्रीची कोणताही परवाना नसताना हॉटेलचे किचन रुममध्ये १३ हजार ५७५ रुपयांच्या दारुच्या बाटल्या आढळून आल्या.

    पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे अधिक तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *