- January 23, 2025
- No Comment
वृद्ध महिलेच्या गळयातील मंगळसुत्र हिसकाऊन नेणाऱ्या चोराच्या २४ तासात आवळल्या मुसक्या, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी

पुणे: विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने धडकेबाज कामगीरी करत वृद्ध महिलेच्या गळयातील मंगळसुत्र हिसकाऊन नेणाऱ्या चोराच्या २४ तासात मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १०/२०२५, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४(२) या गुन्हयातील आरोपीचा शोध विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोउनि राठोड व तपास पथकाचे अंमलदार तपास करत होते. पोहवा ६४६६ अमजद शेख व पोहवा ७४३५ संजय बादरे, यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा आदित्य उकीरडे याने केला आहे. त्यावरुन तपास पथक अधिकारी पोउनि राठोड यांनी तपास पथकातील अंमलदार यांची टिम तयार करून आरोपी आदित्य भैरवनाथ उकीरडे (वय २४ वर्षे, रा. प्रेमळ दत्त मंदिराजवळ, लेन नं १२, भैरवनगर, धानोरी पुणे) यास गुन्हयात अटक करुन त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले ८०,०००/- रुपये किंमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व गुन्हा करुन पळून जाण्यासाठी वापरलेली ५०,०००/- रुपये किंमतीची एक अॅक्टीवा कंपनीची मोटार सायकल असा एकुण १,३०,०००/- रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, हिंमत जाधव, पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, विठ्ठल दबडे सहा. पोलिस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, कांचन जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्रांतवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर, मंगेश हांडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड, पोलिस उप निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर पोलिस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.




