• January 23, 2025
  • No Comment

डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड,९०० किलो तांबे हस्तगत, गुन्हे शाखा युनिट ६ ची उल्लेखनीय कामगिरी

डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड,९०० किलो तांबे हस्तगत, गुन्हे शाखा युनिट ६ ची उल्लेखनीय कामगिरी

    पुणे: डी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळी जेरबंद एकुण १२ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आणि सुमारे ९०० किलो तांब्याच्या तारांसह साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, लोणीकंद व वाघोली पोलीस ठाणे हददीत विदयुत रोहीज (डी.पी.) मधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्हयांमध्ये सतत वाढ होत असल्याने वरिष्ठांकडुन सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित करण्यात आले होते. त्याप्रमाणे लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.क्र. ६७७/२०२४, कलम १३६ भारतीय विदयुत कायदा सह कलम ३२४ (३) भा.न्या. सं.

    हया गुन्हयाचा पुढील तपास युनिट ६, गुन्हे शाखा येथे वर्ग करुन समांतर तपास करण्यात येत होता. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान पोलीस अंमलदार तनपुरे, युनिट ६, गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गोपनीय माहीती व तांत्रिक तपासाच्या आधारावर युनिट ६, गुन्हे शाखा पथकाने ४ आरोपी अटक केले आहेत.

     

    १) अबरार बिलाल अहमद, वय २४ वर्षे, रा. जमुनी, ता. बांसी, जिल्हा. सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश २) आफताब नियामतउल्ला खान, वय ३२ वर्षे, रा. बोरीगाव, शंकर मंदीराजवळ, उरण, नवी मुंबई ३) नफीज हमीद अब्दुल, वय २३ वर्षे, मुळ रा. जमुनी, ता.वांसी, जि.सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे यांनी लोणीकंद ता. हवेली जि. पुणे ४) मोबीन हमीद अब्दुल, मुळ रा. जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुर ता. शिरुर जि. पुणे अशी त्यांची नावे आहेत,या अटक आरोपीकडुन खालील एकुण १२ गुन्हे उघडकीस आणुन त्यामधील एकुण १०,४२, २६०/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०६चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितिन मुंडे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, शेखर काटे महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे यांनी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *