- January 23, 2025
- No Comment
कोरेगाव पार्क येथील हॉटेल डार्क हॉर्स मधील विना परवाना दारुच्या बाटल्यांचा साठा जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: कोरेगाव पार्कमधील डार्क हॉर्स हॉटेल येथे पोलिसांना विनापरवाना बडवायझर मॅगनम, बडवायझर माईल्ड, किंग फिशर, किंग फिशर अल्ट्रा, ब्रिझर ब्लु बेअरी, ब्रिझर जमैका, ब्रिझर ब्लु बेअरी अशा दारुच्या बाटल्या आढळून आल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलीस हवालदार मयुर सूर्यकांत शिंदे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रणव श्यामलाल परदेशी (वय ३५, रा. बर्निग घाट रोड, कोरेगाव पार्क) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना हॉटेल डार्क हॉर्स येथे विना परवाना दारु विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता तेथे छापा टाकला. त्यात प्रणव परदेशी याच्या ताब्यात १९ हजार ९२५ रुपयांच्या विदेशी दारुच्या बाटल्या विना परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या जप्त करुन कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार लोखंडे करीत आहेत.




