- January 23, 2025
- No Comment
पिंपळे गुरव येथे बेकायदा कोयते बाळगणारे दोन टोळकी अटक

पिंपळे गुरव (पिंपरी): शस्त्र बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. ही कारवाई रविवारी (दि. २०) रात्री पिंपळे गुरव येथे करण्यात आली. राजेश अशोक हरळ्या (वय १८, रा.पिंपळे गुरव), यशोदीप गणेश चिखले (वय १९, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील स्मशानभूमी येथे दोघेजण शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून राजेश आणि यशोदीप यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन कोयते आढळून आले. पोलिसांनी कोयते जप्त करत दोघांना अटक केली. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.




