• January 24, 2025
  • No Comment

धक्कादायक! भिंतीला डोके आपटून केला खून, आरोपी अटक

धक्कादायक! भिंतीला डोके आपटून केला खून, आरोपी अटक

    पुणे: नेहरु मेमोरियल चौकातील फुटपाथवर एकाचा मारहाण करुन खून केल्याचा घटना उघडकीस आली. खून झालेली व्यक्ती फिरस्ता असावी, अशी पोलिसांना शंका आहे.

    त्याचा खून करणार्‍याला पोलिसांनी पकडले. तोही फिरस्ता असल्याचा संशय असून तो स्वत:चे नावही सांगत नाही. त्यामुळे खून झाला, आरोपी पकडला पण दोघांचीही नावे आणि खूनामागील कारण अद्याप समजू शकले नाही.

    याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन हरिबा मोहिते यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना नेहरु मेमोरियल चौकातील फुटपाथवर २२ जानेवारीला पहाटे ३ वाजून ४३ मिनिटे ते ४ वाजून २५ मिनिटांच्या दरम्यान घडली आहे.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरु मेमोरियल चौकातील फुटपाथवर बसलेल्या एकाने अंदाजे ६० वर्षाच्या ज्येष्ठाला एका ३५ ते ४० वर्षाच्या पुरुषाने काही कारण नसताना जीवे मारण्याच्या उद्देशाने खाली पाडून तोंडावर लाथांनी मारहाण करुन जीवे ठार मारले.

    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एकाने ज्येष्ठ नागरिकाचे भिंतीला डोके आपटल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी एकाला पकडले. खून झालेला आणि मारणारा आरोपी हे दोघेही फिरस्ते असावेत. आरोपीने अजूनपर्यंत स्वत:चेही नाव पोलिसांना सांगितलेले नाही. त्यामुळे खून झाला, आरोपी मिळाला. पण दोघेही अनोळखी अशी सध्याची तपासाची स्थिती आहे. पोलीस आरोपीकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *