- January 24, 2025
- No Comment
गुटखा विक्री प्रकरणी टोळका अटक

पिंपरी: गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. २२) दुपारी पवारवस्ती, चिखली येथे करण्यात आली.
रामप्रसाद देवताप्रसाद चौरासिया (वय ४२, रा.कुरुळी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामप्रसाद याने त्याच्या टपरी मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रामप्रसाद याला अटक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.




