• January 24, 2025
  • No Comment

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात, तळेगाव नगरपरिषदेची धडक कारवाई

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात, तळेगाव नगरपरिषदेची धडक कारवाई

    तळेगाव: तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी (दि.23) शहरातील प्रमुख रस्त्यांवर रहदारी व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. मारुती मंदिर चौकातून कारवाईची सुरुवात झाली.

     

    यानंतर जिजामाता चौक, तळेगाव स्टेशन रस्ता, तळेगाव स्टेशन चौक, वीरचक्र चौक व यशवंत नगर परिसरामध्ये अनधिकृतपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या हातगाडी, भाजीपाला टपरी आदी अतिक्रमणांवर ही कारवाई केली गेली.

    मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्यअधिकारी ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नगररचनाकार विश्वजीत कदम, सहाय्यक विजय नारगुंडे, गणेश कोकाटे, राम सरगर, कर अधिकारी कल्याणी लाडे, स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले, तुकाराम मोरमारे, भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन, अतिक्रमण पथक सहाय्यक विशाल मिंड, वैशाली आडकर, उषा बेल्हेकर आदी अधिकारी कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *