- January 24, 2025
- No Comment
पोक्सोतील फरार आरोपीच्या २४ तासांच्या आत गजाआड; लोणी काळभोर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

लोणी काळभोर: लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या एका मुलीसोबत अश्लिल कृत्य करुन त्या अश्लिल कृत्याचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या फरार आरोपीला पकडण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे.
आरोपीवर लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. साहिल मेहबुब शेख (वय १९ वर्षे रा. मोरेवस्ती, मांजुरी बु. हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत राहण्यास असलेल्या पीडित मुलीसोबत आरोपी साहिल मेहबुब शेख याने मैत्रीसंबंध प्रस्तापीत केले. पीडित मुलीचे बाल वयाचा फायदा घेवुन आरोपीने तिच्याशी वारंवार अश्लिल कृत्य करुन सदर अश्लिल कृत्याचे फोटो त्याचे मोबाईलमध्ये काढले होते. पिडीत मुलीने आरोपीस अश्लिल कृत्य करण्यास व प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला असता आरोपीने पिडीतेस तीचे त्याचेसोबतचे फोटो सोशल मेडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
तसेच आरोपीने पीडितेच्या आईला देखील फोनव्दारे संपर्क साधुन पीडित मुलीचा त्याच्यासोबत विवाह लावून द्यावा अन्यथा पिडीत मुलीसोबत त्याचे असलेले फोटा सोशल मेडीयावर प्रसारीत करण्याची धमकी दिली होती.
या गुन्ह्यानंतर आरोपी फरार होता. त्याने त्याचा मोबाईल व सर्व प्रकारची संपर्काची साधने बंद केल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करुन आरोपीचा शोध घेतला.
अखेर लोणी काळभोर चे पथकास फरार आरोपी साहिल मेहबुब शेख याला पकडण्यात यश आले. त्यानुसार सदर आरोपीस दि. २१ जानेवारी रोजी पहाटे लोणी काळभोर पोलीसांनी २४ तासांच्या आत अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. सदर कारवाई लोणी काळभोर पोलिसांनी केली आहे.




