- January 25, 2025
- No Comment
दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा, गुन्हे शाखेने एक ची उल्लेखनीय कामगिरी

चिंचवड: चिंचवडमधील नागसेननगर झोपडपट्टीत गुन्हे शाखेने एक कारवाई केली. दारू विक्री प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून ७५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
गोविंदकुमार भोलाराम (३९, चिंचवड. मूळ रा. गाजीपुर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विपुल जाधव यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागसेननगर येथे एक व्यक्ती दारू विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत साडेसात हजार रुपये किमतीची ७५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.